सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च

महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींवर जनतेचे लक्ष लागले आहे.
eknath shinde, radison blu, shivsena, guwahati
eknath shinde, radison blu, shivsena, guwahatisaam tv
Published On

गुवाहटी : शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या समवेत 80 टक्के पेक्षा जास्त शिवसेनेच्या (shivsena) आमदारांनी बंडखाेरी केल्याने राज्यात कार्यरत असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार (mva) काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र बाहेर असलेले हे सर्व आमदार आधी सूरत आणि आत्ता गुवाहटीतील अलिशान हाॅटेलमध्ये वास्तव्यास आहेत. बंडखाेर आमदारांसह मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांच्या मदतीसाठी राहिलेल्या एकूण 55 जणांसाठी तब्बल हाॅटलेच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' झाल्याचे समजते. हे बुकींग कोणी केले आहे अद्याप समाेर आलेले नसले तरी हा सर्व खटाटाेप करण्यासाठी लाखाे रुपयांचा खर्च हाेत असल्याचे स्पष्ट हाेत आहे. (eknath shinde latest marathi news)

लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी येथून राष्ट्रीय महामार्ग 37 वर सुमारे अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या गुवाहाटीमधील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक 'रॅडिसन ब्लू' (Radison Blu) आहे. गेल्या दाेन दिवसांत हे हॉटेल राजकीय केंद्र बनले आहे. त्याला विशेष कारण देखील आहे. या हाॅटेलमध्ये सध्या शिवसेनेचे सुमारे 40 ते 42 बंडखाेर आमदार तळ ठोकून आहेत. ज्यांच्या भुमिकेमुळे ठाकरे सरकार धाेक्यात आले आहे.

eknath shinde, radison blu, shivsena, guwahati
बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी

रॅडिसन ब्लू हे हाॅटेल पंचतारांकित आहे. सध्या येथे राहत असलेल्या आमदारांना मिळणा-या सुविधांसाठी लाखाे रुपये खर्च हाेत असल्याचे या हाॅटेलच्या दरावरुन स्पष्ट हाेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या 70 खोल्या सात दिवसांसाठी 'बुक' करण्यात आल्या आहेत. त्याचे बुकींग काेणी केले हे मात्र समजू शकलेले नाही. शिवसेना आणि अपक्षांसह सुमारे 55 जण या हाॅटेलमध्ये आहेत. सात दिवसांसाठी सुमारे 56 लाख रुपये खर्च असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय खाण्यापिण्यासह इतर खर्च दररोज आठ लाख रुपये आहे. याचा अर्थ सात दिवसांसाठी एक कोटी 12 लाख रुपये येऊ शकताे.

eknath shinde, radison blu, shivsena, guwahati
विदेशातही गाजले एकनाथ शिंदे! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

यामध्ये चार्टर्ड फ्लाइटचा खर्च, विमानतळ ते हॉटेलपर्यंतचे वाहनाच्या शुल्काची भर पडणार आहे. याव्यतिरिक्त, इतर खर्च आहेत. संबंधित हॉटेलच्या संकेतस्थळावर गेल्यावर या हॉटेलच्या सर्व खोल्या जून अखेर बुक असल्याचे दिसून येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

eknath shinde, radison blu, shivsena, guwahati
Satara: दराेडेखाेराचा पाेलीसांवर हल्ला; एलसीबीच्या पथकाने जीवाची पर्वा न करता केले त्याला जेरबंद
eknath shinde, radison blu, shivsena, guwahati
आठशे पदांची हाेणार भरती; जाणून घ्या एमपीएससी पूर्व परीक्षा रचनेत झालेला महत्‍वपूर्ण बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com