Cotton Candy : कॉटन कँडीचा रंग बदलला! FDA च्या कारवाईनंतर विक्रेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Pune Cotton Candy FDA ACtion : पिंपरी-चिंचवडमध्ये FDA च्या सूचनांनंतर कॉटन कँडीतील कृत्रिम रंगांचा वापर टाळला जात आहे. त्यामुळे गुलाबी, निळी कँडी आता पांढरी दिसत आहे.
Cotton Candy Color Change pune
Cotton Candy Color Change pune AI image
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडमध्ये कॉटन कँडीचा रंग बदलला

  • कृत्रिम खाद्य रंगांचा वापर टाळण्याच्या प्रशासनाच्या सूचना

  • कॉटन कँडी आता पांढऱ्या रंगात

  • FDA कडून कॉटन कँडी विक्रेत्यांवर लक्ष

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे 'म्हातारीचे केस' म्हणजेच कॉटन कँडीच रूप बदललं आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) अन्नामधील भेसळ टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. आता खाद्यपदार्थांमध्ये कलर टाकल्यास त्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते. अशातच आता पिंपरी-चिंचवडमध्ये कॉटन कँडीमध्ये वापरेल जाणारे कलर टाळल्यामुळे कॉटन कँडी अगदी म्हातारीच्या केसांप्रमाणे पांढरी दिसायला लागली आहे. एकीकडे FDA च्या या निर्णयाचं स्वागत केलं तर दुसरीकडे मात्र रंग उडालेले पदार्थ खाताना नागरिक विचारत पडले आहेत.

कॉटन कँडी ही साखरेपासून तयार केली जाते. मशीनमध्ये साखर फिरवल्यानंतर तिचे बारीक कण तयार होतात आणि कापसासारखा आकार देऊन ही कँडी ग्राहकांना विकली जाते. आकर्षक दिसण्यासाठी यामध्ये विविध कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. मात्र, खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात.

Cotton Candy Color Change pune
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरातील कॉटन कँडी विक्रेत्यांनी रंगीत कँडी तयार करण्याऐवजी विना रंगाची पांढरी कॉटन कँडी तयार करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठांमध्ये पूर्वी गुलाबी, निळी, हिरवी अशा विविध रंगांमध्ये दिसणारी कॉटन कँडी आता पांढऱ्या रंगात पाहायला मिळत आहे.

Cotton Candy Color Change pune
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

प्रशासनाच्या सूचनांनंतर विक्रेत्यांमध्येही जागरूकता वाढल्याचे चित्र आहे. ग्राहकांना आकर्षक रंगांपेक्षा खाद्यपदार्थाची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये कॉटन कँडीची मोठी क्रेझ असल्याने त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांकडे पालकांचेही लक्ष आहे. दरम्यान, एफडीए प्रशासनाकडून कॉटन कँडीच्या विक्रीवर लक्ष ठेवले जात असून, नियमांचे पालन करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com