Pune Metro construction: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास

Shivajinagar Metro line robbery: पुण्यातील शिवाजीनगरमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २ लाख ६० हजार रूपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आलंय.
Pune News
Pune NewsSaam Tv News
Published On

पुण्यातील शिवाजीनगरमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल २ लाख ६० हजार रूपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आलं आहे. चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

पुण्यात मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रधान (वय वर्ष २३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रधान हे पुणे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइझर पदावर कार्यरत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना चोरट्यांनी अडीच लाख रूपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून पळ काढला. त्यांनी ही चोरी कामगार पुतळा भागातून केली असल्याचं समोर आलं आहे.

Pune News
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, VIDEO पोस्ट करत सांगितलं पद सोडण्यामागचं कारण

ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरी गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकी भागात अशा घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मर्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.

Pune News
Aishwarya Narkar: कमनीय बांधा, लांबसडक केस; ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचं सिक्रेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com