Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, VIDEO पोस्ट करत सांगितलं पद सोडण्यामागचं कारण

Mamta Kulkarni Mahamandaleshwar : ममता कुलकर्णी पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
mamta kulkarni
mamta kulkarniSaam Tv
Published On

महाकुंभमेळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची चर्चा झाली. तिने संन्यास घेतला होता. अध्यात्माचा मार्ग स्वीकारत ममताने महामंडलेश्वर हे पद स्वीकारलं. महामंडलेश्वर पद स्वीकारल्यानंतर तिचं नावही बदललं. यमाई ममता नंद गिरी हे नाव तिला देण्यात आलं. मात्र, महामंडलेश्वर हे पद स्वीकारल्यानंतर किन्नर आखाड्यात वाद शिगेला पोहोचला. संत महंतांनी आक्षेप घेतला. तिने महामंडलेश्वर हे पद सोडलं.

मात्र, ममता पुन्हा चर्चेत आली आहे आणि चर्चेचं कारण म्हणजे अर्थात महामंडलेश्वर पद. तिने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने सोशल माध्यमांमध्ये व्हिडिओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच व्हिडिओमध्ये तिने पद सोडण्याचं नेमकं कारणही सांगितलं.

ममता नेमकं काय म्हणाली?

व्हिडिओमध्ये ममताने महामंडलेश्वर पद का सोडलं याची माहिती दिली. 'माझे गुरू डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मी दु:खी होऊन महामंडलेश्वर हे पद भावनेच्याभरात सोडलं. महामंडलेश्वर हे पद स्वीकारल्यानंतर मी माझ्या गुरूला भेटले'.

mamta kulkarni
Valentine: व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून बेदम चोपलं, तरूणाचा मृत्यू

'गुरूला भेट म्हणून मी छत्र, छडी आणि चंवर दिले. त्यानंतर उरलेली रक्कम मी भंडार्‍यासाठी दिली होती. मला पुन्हा महामंडलेश्वर पदी बसवलं. त्याबद्दल मी माझ्या गुरूंचे आभार मानते. माझं पुढचं आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला अर्पण करणार आहे', असं व्हिडिओत ममता म्हणाली.

mamta kulkarni
Aishwarya Narkar: कमनीय बांधा, लांबसडक केस; ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचं सिक्रेट काय?

गुरूंची प्रतिक्रिया

किन्नर आखाड्याच्या पीठाधीश आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीने पुन्हा महामंडलेश्वर पद स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'यमाई ममता नंद गिरी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. ती कायम महामंडलेश्वर राहील. भावनेच्या भरात तिनं महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता. पण आम्ही तो राजीनामा स्वीकारला नाही, असं त्रिपाठी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com