
दिल्लीत काँग्रेस आता गलितगात्र झालीये..सलग तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही...त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं नेमकं कुठं चुकलं याची चर्चा सुरू झालीए. दिल्लीत 1993मध्ये भाजपची सत्ता होती. ही सत्ता काँग्रेसनं सोनिया गांधींच्या नेतृत्वात 1998 मध्ये खेचून घेतली. यावेळी काँग्रेसला...
1998 मध्ये 52 जागा
2003 मध्ये 47 आणि 2008 मध्ये 43 जागा जिंकल्या
काँग्रेसच्या सलग तिसऱ्या विजयानंतर भाजपकडून 2008 मध्ये आयोगात तक्रार
काँग्रेसने EVM छेडछाड केल्याचे भाजपकडून आरोप
या आरोपांवर पडदा पडेपर्यंत 2013 उजाडलं...केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यातच समाजसेवक अण्णा हजारेंसह केजरीवालांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरून रान पेटवलं आणि काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला. नव्यानं आलेल्या केजरीवालांच्या आपला दिल्लीकरांनी पसंती दिली.
'आप'ला साथ ते 'आप'कडून मात
2013 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आप-काँग्रेस आघाडी
भ्रष्टाचारविरोधी कायद्यावरून आप-काँग्रेसमध्ये वादावादी
दीड वर्षांत काँग्रेसनं आप सरकारचा पाठिंबा काढला
2015च्या निवडणुकीत 'आप'ला घवघवीत यश,काँग्रेसचा सुपडा साफ
2020 मध्ये आपला पुन्हा 62 जागा, काँग्रेसला भोपळा
2025 मध्ये काँग्रेसची भोपळ्याची हॅटट्रीक
भाजपने तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली.. राहुल गांधी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आजारी होते. प्रचाराची सर्व सूत्र राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडे होती. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या मायक्रो नियोजनापुढे काँग्रेस आणि आप पूर्णपणे निष्प्रभ ठरली. काँग्रेसला दिल्ली सारख्या राज्यात तिसऱ्यांदा पराभवाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्विकारुन राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पक्षात बदल करणार की पुन्हा केवळ मंथन करुन पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.