Mumbai BJP : मंत्र्यांवर 'पक्ष सचिवां'ची करडी नजर, मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा?

BJP Minister Special Secretary : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेचा लाभ भाजप कार्यकर्त्यांनाही मिळावा म्हणून भाजपने नवी रणनीती आखलीय.
BJP appoints special secretary
BJP appoints special secretary SaamTV
Published On

मुंबई : भाजपच्या मंत्र्यांवर नजर ठेवण्यासाठी पक्षानं आता खास सचिवांची नियुक्ती केलीय. हे सचिव नेमकं काय करणार आहेत? आणि पक्षानं त्यांची नियुक्ती कशासाठी केलीय? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेचा लाभ भाजप कार्यकर्त्यांनाही मिळावा म्हणून भाजपने नवी रणनीती आखलीय. प्रत्येक मंत्र्याचा एक खासगी पीए पक्ष आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. तर सुधीर देऊळगावकर यांच्याकडे समन्वयक पद देण्यात आलंय. याबाबत पहिल्या टप्प्यात १३ पीएंची नियुक्ती करण्यात आलीय. यामध्ये कोणत्या मंत्र्याकडे पीए नेमण्यात आलाय? पाहूयात.

BJP appoints special secretary
Delhi Election Result : अखेर दिल्लीत कमळ फुललं...! 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय, दारू घोटाळा 'आप'ला भोवला?

चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

गणेश नाईक, वनमंत्री

पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री

अतुल सावे, पशू संवर्धन मंत्री

अशोक उईके, आदिवासी विभाग

आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान

शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम

जयकुमार गोरे, ग्रामविकास

संजय सावकारे, वस्त्रोद्योग

नितेश राणे, मत्स्यपालन आणि बंदरे

मेघना बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री

यापूर्वीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप, संघ आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखण्यासाठी श्रीकांत भारतीय यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. या खासगी पीएकडे कोणत्या जबाबदाऱ्या असणार आहेत? पाहूयात.

पक्षाच्या सचिवांची मंत्र्यांवर नजर?

पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्ये समन्वय राखणे

मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणे

संघ आणि पक्ष संघटनेशी संबंधित कामे मार्गी लावणे

मंत्र्यांच्या खासगी पीएला शासकीय वेतन आणि भत्ते

BJP appoints special secretary
आपचे १५ आमदार शिवसेनेकडून लढायला तयार होते, पण...; एकनाथ शिंदेंनी सांगितली निवडणुकीआधीची इनसाइड स्टोरी

भाजपच्या शिर्डीतील अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्र्यांचा एक पीए सरकार आणि पक्ष संघटनेत दुवा म्हणून काम करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संघाच्या मुशीत तयार झालेल्यांना मंत्र्यांचे पीए म्हणून नेमण्यात येतंय. त्यामुळे ही निवड मंत्र्यांवर नजर ठेवण्यासाठी आहे की पक्ष कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com