Mumbai Politics : मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत इतक्या जागांवर निवडणूक लढवणार

Maharashtra Vidhan Sabha Election News : सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मुंबईत १३ ते १५ जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत इतक्या जागांवर निवडणूक लढवणार
Maharashtra Vidhan Sabha Election NewsSAAM TV
Published On

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाचा चांगलाच आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरु केली आहे. नुकतीच मुंबईत काँग्रेसची एक महत्वाची बैठक पार पडली.

मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत इतक्या जागांवर निवडणूक लढवणार
Kolhapur Breaking News : मनसेच्या जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा; दोघांनाही अटक

या बैठकीला नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड, अमिन पटेल, झिशान सिद्दीकी आणि अस्लम शेख, अशा ४ महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीत मुंबईतील (Mumbai) जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मुंबईत १३ ते १५ जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचा आगामी विधानसभेत (Vidhan Sabha Election) काँग्रेस अधिकच्या जागा मागण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कुलाबा, मुंबा देवी, भायखळा, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, बांद्रा, बांद्रा पूर्व, चांदीवली, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, मालाड पश्चिम आणि जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्ष दावा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील यंदाच्या निवडणुकीत मुंबईत ८ ते ९ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर ठाकरे गट देखील मुंबईत सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिका आणि बरेच विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. उद्धव ठाकरे यांची मुंबईत मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत काँग्रेसच्या वाटेला मुंबईत किती जागा येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मोठी बातमी! विधानसभेसाठी काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत इतक्या जागांवर निवडणूक लढवणार
Maratha Reservation : मुंबईत मराठा आंदोलकांची धरपकड; सागर बंगल्यावर धडकण्याआधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com