Maratha Reservation : मुंबईत मराठा आंदोलकांची धरपकड; सागर बंगल्यावर धडकण्याआधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात, पाहा VIDEO

Mumbai Maratha Andolan News : “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे कूच केली. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
Mumbai Maratha Andolan New
Mumbai Maratha Andolan NewSaam TV
Published On

मराठा आरक्षणाचा विषय तातडीने मार्गी लावा, अशी मागणी करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले. “जवाब दो जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो” अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे कूच केली. मात्र, त्याआधीच गिरगाव चौपाटीवर तैनाद असलेल्या पोलिसांनी त्यांची धरपकड केली.

Mumbai Maratha Andolan New
Mla Disqualification : आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

पोलिसांनी आतापर्यंत अनेक मराठा आंदोलकांना (Maratha Reservation) ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांनी सर्वात आधी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी कुणाचंही ऐकलं नाही. ते सागर बंगल्याकडे जाण्याच्या निर्णयावर ठाम होते. सरकारने आरक्षणाचा विषय तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे.

'आमचा उद्रेक बघू नका'

मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. त्यामुळे आम्हाला नोकरी आणि शिक्षणात टिकणारे आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने (Eknath Shinde Government) तातडीने मार्गी लावायला हावा. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे आमचा उद्रेक बघू नका. बांगलादेशमध्ये काय झाले, हे बघतच आहात, असा इशाराही मराठा आंदोलकांनी दिला.

उद्धव ठाकरेंनाही घातला होता घेराव

यापूर्वी मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवास्थानावर धडक दिली होती. यावेळी मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही. हा अधिकार केंद्राचा आहे. केंद्र सरकारची आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची तयारी असेल, तर माझे खासदार पाठिंबा द्यायला तयार आहे. आपण सर्व मिळून मोदींकडून जाऊयात, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

मराठ्यांचं शिष्टमंडळ घेणार फडणवीसांची भेट

मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात पक्षाची भूमिका काय? याबाबत चर्चा करणार आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिला होता.

Mumbai Maratha Andolan New
Anil Deshmukh: देशमुखांना जेल, परमबीरांसोबत डील? अनिल देशमुखांचे फडणवीसांवर नवे आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com