Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; काँग्रेसचा मोठा निर्णय

भाजप विरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे.
Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; काँग्रेसचा मोठा निर्णय
Published On

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर अंधेरी येथील पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मोठी निवडणून नोव्हेंबरमध्ये पार पडत आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनणार यात शंका नाही. काँग्रेसने या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा दिलासा मिळाला आहे.

Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; काँग्रेसचा मोठा निर्णय
BMC निवडणुकीत उद्धव ठाकरेंना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, सामनातील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Latest Marathi News)

नाना पटोले यांनी याबाबत म्हटलं की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.

Andheri By-election : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; काँग्रेसचा मोठा निर्णय
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, ‘खोके’वाल्यांचा अधर्म निष्ठेपुढे कसा टिकेल? सामनातून भाजप-शिंदे गटावर टीकास्त्र

कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भाजपने ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

भाजप विरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com