भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, ‘खोके’वाल्यांचा अधर्म निष्ठेपुढे कसा टिकेल? सामनातून भाजप-शिंदे गटावर टीकास्त्र

मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल.
Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv
Published On

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनातून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीक करण्यात आली आहे. शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला आहे. मात्र खोके वाल्यांचा अधर्म निष्ठेपुढे कसा टिकेल असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. तर भाजप (BJP) महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, असं भाकितही करण्यात आलं आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना अग्रलेखात म्हटलं की, "आज साडेतीन मुहूर्तांपैकी एका पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी केली आहे ती महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी. हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते. अनेक लाटा आणि कपट-कारस्थानांशी टक्कर देत शिवतीर्थावरील हे सीमोल्लंघन सुरूच राहिले आहे."

Uddhav thackeray
Nagpur : दीक्षाभूमीवर आज ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन; चोख पोलीस बंदोबस्त

आज रावणांचा नाश करणार?

"यंदाचा दसरा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे. रावण मारला गेला तो आजच्याच दिवशी. रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली होती. त्या अहंकाराने त्याचा बळी घेतला. महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात आज सगळे काही विस्कटलेले आहे. एक राज्य गेले व दुसरे आले म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले असे म्हणता येत नाही." (Latest Marathi News)

बानकुळेंच्या वेगळ्या विदर्भाच्या वक्तव्यावर टिकास्त्र

"बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदावर येताच काय जाहीर केले, ‘‘योग्य वेळ येताच विदर्भ हे स्वतंत्र राज्य करू.’’ म्हणजे देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत आहेत."

"गुजरातला बदनाम करण्याचे व या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे कारस्थान काही जणांनी रचल्याचे विधान आमच्या पंतप्रधानांनी करावे हे दुर्दैवच म्हणायला हवे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते गुजरातइतकेच महाराष्ट्राचे आहेत हे तत्त्व आम्ही तरी पाळतो, असेही शिवसेनेने म्हटले."

Uddhav thackeray
Accident : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार

"मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठsपुढे कसा टिकेल?" असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com