Nagpur : दीक्षाभूमीवर आज ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन; चोख पोलीस बंदोबस्त

धम्मचक्र प्रवर्तन दिनानानिमित्त देशभरातील बौद्ध बांधव दीक्षाभुमीवर
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv
Published On

नागपूर - दीक्षाभूमीवर आज ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे. १४ ॲाक्टोबर १९५६ रोजी नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दलित, शोषित, पीडितांना जाती, धर्माच्या बंधनातून मुक्त करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दसऱ्याचा दिवस होता. त्यामुळे दसऱ्याला दरवर्षी नागपूरच्या (Nagpur) दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध बांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. (Maharashtra Latest News)

Nagpur News
Akola News : दसऱ्याच्या दिवशी 'या' गावात आजही होते रावणाची पूजा, नेमकी काय आहे प्रथा?

आज देशाच्या कानाकोपऱ्यातुन बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर आले आहेत. दीक्षाभूमी बौद्ध बांधवांनी फुलली आहे. जयभीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे. पीएफआयवरील कारवाईच्या पार्श्वभुमिवर दीक्षाभुमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे सर्व जग हैराण होतं. भारतातही सण साजरे करण्यावर अनेक निर्बंध होते. त्यामुळेच धम्मचक्र प्रवर्तन दिनही हवा तसा साजरा करता येत नव्हता. पण आता कोरोनानंतर होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील सर्वच राज्यातून बौद्ध अनुयायी येणार आहेत.

संघाचा आज विजयादशमी उत्सव

नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये मोठा उत्साह आहे. सुरुवातीला सरसंघचालक शस्त्र पूजन करतील. त्यानंतर प्रात्यक्षिक आणि कवायती होतील. यंदा पहिल्यांदाच विजयादशमी उत्सावात महिला मुख्य अतिथी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com