Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

BMC निवडणुकीत उद्धव ठाकरेंना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, सामनातील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

उद्धव ठाकरे यांनी कधी विचारही केला नसेल एवढा विजय आमचा होईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Published on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनातून भाजपवर झालेल्या टिकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयम सोडला आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात पुन्हा धक्का? काही खासदार-आमदार शिंदे गटात सामील होणार?

यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, भाजप 100 टक्के जिंकेल. शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून अंधेरी पोटनिवडणुकीत आमचा ऐतिहासिक विजय होईल. उद्धव ठाकरे यांनी कधी विचारही केला नसेल एवढा विजय आमचा होईल. दोन अडीच वर्षाचा राग या विधानसभेत निवडणुकीत निघेल. (Latest Marathi News)

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती त्यांची होईल असा दावाही चंद्रशेखर बानकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात हृदयात जे आहे तेथे सामनातून लिहितात. सत्ता गेल्यामुळे त्यांनी संयम सोडला आहे, सामनामधून ते आपला संयम दाखवतात.

Uddhav Thackeray
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, ‘खोके’वाल्यांचा अधर्म निष्ठेपुढे कसा टिकेल? सामनातून भाजप-शिंदे गटावर टीकास्त्र

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा म्हणजे टोमणे सभा होणार आहे. ते फक्त टोमणे मारतील, त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे. याशिवाय त्यांना दुसरं आता काम नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलतील.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन घेऊन त्यांची गर्दी आणून उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. शिंदे यांच्याकडे 40 आमदार, 12 खासदार आहेत. मोठी जनशक्ती त्यांच्याकडे आहे. एवढा मोठा गट जर शिंदे यांच्याकडे असेल तर त्यांचा मेळावाही मोठा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com