CJP च्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? पक्षबांधणीनंतर आता ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा

Cockroach Janta Party: कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पक्षबांधणीच्या हालचालींनंतर आता समोर आलेल्या ‘Cockroach Club – Stay Tuned’ या पोस्टरमुळे चर्चांना सुरुवात झाली आहे.
CJP च्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? पक्षबांधणीनंतर आता ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा
Cockroach ClubSaam tv
Published On: 

अक्षय बडवे, पुणे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर काहीशी शांत झालेली कॉक्रोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एखाद्या मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे का? पक्षबांधणीच्या हालचालींनंतर आता समोर आलेल्या ‘Cockroach Club – Stay Tuned’ या पोस्टरमुळे चर्चांना सुरुवात झाली आहे. सीजेपीच्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? अशी चर्चा आता होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर भर देताना दिसत आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्य समन्वय समिती जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता पक्षाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘Cockroach Club’ असे नाव असलेले आकर्षक पोस्टर झळकले असून त्यावर ‘STAY TUNED’ आणि ‘COMING SOON’ असा संदेश देण्यात आला आहे.

CJP च्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? पक्षबांधणीनंतर आता ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा
CJP Protest: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन संपले नाही, तुरूंगातून बाहेर येताच सीजेपी नेत्यांची नवी घोषणा

या पोस्टरमध्ये व्यासपीठ, माईक आणि तीन व्यक्तींची प्रतीकात्मक रेखाचित्रे दिसत आहेत. मध्यभागी पक्षाचा लोगो लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या पोस्टरमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहेत ते म्हणजे तीन व्यक्तींची रेखाचित्रे! या तीन व्यक्ती नेमक्या कोण आहेत? त्यांच्यामागे काही विशेष संदेश दडलेला आहे का? मात्र, या पोस्टरमागे नेमकी काय संकल्पना आहे? ‘Cockroach Club’ च्या माध्यमातून CJP काही नवीन उपक्रम सुरू करणार आहे का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

CJP च्या मनात नेमकं शिजतंय तरी काय? पक्षबांधणीनंतर आता ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा
CJP नेत्यांच्या पायात कायद्याच्या बेड्या, CJP समोर चार मोठी आव्हानं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.