Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही ठाकरेंसमोर काय आव्हाने असणार आहेत, जाणून घेऊयात.
maharashtra politics
raj and Uddhav Thackeray Saam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तब्बल १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कोणाचं राजकीय नुकसान होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना कोणती आव्हाने असणार आहेत, जाणून घेऊयात.

मुंबईच्या वरळीतील विजय मेळाव्याला हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळाली. या मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी शक्तिप्रदर्शन केलं. राज ठाकरेंनी २००६ साली शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली होती. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

maharashtra politics
Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

ठाकरे बंधूचा राजकीय संदेश

राज आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून अप्रत्यक्षपणे युतीची घोषणा केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी जनतेसमोर केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे दोन्ही ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे दिसत आहे.

maharashtra politics
Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

२०२४ च्या निवडणुकीत राजकीय नुकसान

मागील दशकभरापासून दोन्ही भावांनी राजकीय मार्ग बदलले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या हिंदूत्ववादी भूमिकेला समर्थन दिलं होतं. मात्र, २०२४ साली झालेल्या निवडणुकीत दोन्ही भावांचं मोठं नुकसान झालं.

maharashtra politics
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

युती की पक्ष म्हणून एकत्र येणार?

उद्धव आणि राज ठाकरे यांचा पक्ष एकत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक ठाकरे, एक शिवसेना असाही नारा दिला जाण्याची देखील शक्यता आहे. मनसे आणि ठाकरे गट आगामी निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु दोन्ही पक्षात ठाकरे आहेत. दोघांची नेतृत्वाची शैली आणि संघटन कौशल्य वेगळं आहे.

महाविकास आघाडीचं काय होणार?

मनसे आणि ठाकरे गट एकत्र झाल्यास सर्वात मोठं आव्हान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी असणार आहेत. धर्मनिरपेक्ष भूमिका सांभाळून असलेल्या काँग्रेस मनसेचा स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर शरद पवार मध्यस्थीची भूमिका घेणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मतांचं विभाजन?

राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे शहरात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या सर्व शहरात मनसे आणि ठाकरे गटाला मानणारा वर्ग आहे. त्यात महाविकास आघाडीत चौथा पक्ष जोडला गेला तर चार पक्षात जागावाटप गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com