

सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना जामीन
तुरुंगातून बाहेर येताच सीजेपी नेत्यांची नवी घोषणा
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सीजेपीचे आंदोलन सुरूच राहणार
जंतर-मंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अखेर बुधवारी जामीन मिळाला. सीजेपीचे दोन्ही नेते तुरुंगातून बाहेर आले. त्यांनी कोर्टाला यापुढे जंतर मंतरवर जाणार नाही असे सांगितले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सीजेपीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्वतः या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे पुढचे पाऊल काय असणार आहे याची घोषणा त्याने अद्याप केलेली नाही.
दिल्ली हायकोर्टाने ताकीद दिल्यानंतर, सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना जामीन दिला. हायकोर्टाने बुधवारी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कोर्टाने त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यास सांगितले होते. त्यानंतर काही तासांतच दोन्ही नेत्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन दिला.
तुरूंगातून बाहेर येताच सौरभ दासने एक नवी घोषणा केली. सौरभ दासने बुधवारी रात्री जवळपास ९ दिवसांनंतर 'एक्स'वर आपली पहिली पोस्ट टाकली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की,'ज्ञानूला जायलाच हवे.' तसं पाहायला गेलं की, हा शब्दप्रयोग सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अभिजीत दीपकने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सौरभ दासा आणि आशुतोष रांका हे दोघेही दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते 'भारत माता की जय आणि इन्किलाब जिंदाबाद' ज्ञानेश कुमारला जायलाच लागेल', असे म्हणताना दिसत आहेत.
अभिजीत दीपकने सांगितले होते की, सीजेपीच्या दोन्ही नेत्यांची सुटका झाल्यानंतर पुढील रणनीती आखली जाईल. तो म्हणाला की, 'आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची सुटका झाल्यावर आम्ही पुन्हा भेटून नवीन रणनीती आखू. हे प्रकरण कसे पुढे नेता येईल, हे आम्ही पाहू. कारण गेल्या काही दिवसांत आम्ही पाहिले आहे की, लोकांना कशाप्रकारे बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले जात आहे. एक प्रकारे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.' रांका आणि दास गहे दोघे तुरूंगातून बाहेर आले आहेत. आता सीजेपी नेत्यांची बैठक होऊन ते पुढील रणनीती ठरवतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.