कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Cockroach Janata Party NEET Protest: नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन उधळण्याचा कट आखण्यात आलाय. या कटामागे कोण आहे? कुणी याबाबत आरोप केलाय? यावरचा हा रिपोर्ट.
Cockroach Janata Party  NEET Protest
Abhijeet Dipke post on NEET protest controversysaam tv
Published On

रोहित कदम, साम प्रतिनिधी

देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. एव्हंढच नाहीतर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात येत्या 20 जुलैला संसदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

Cockroach Janata Party  NEET Protest
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीसोबत काँग्रेस करणार युती? बड्या नेत्याच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात खळबळ

मात्र गुंड पाठवून हे आंदोलन उधळण्याचा कट केला जात असल्याचा आरोप अभिजित दीपके यांनी पोस्टमध्ये केलाय. उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलीये. यावेळी त्यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधताना खळबळजनक दावा केलाय. विशेष म्हणजे, सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसले आहेत. वांगचुक यांची प्रकृती आता कमालीची खालावलीय. त्यामुळे अण्णा हजारेंनीही या उपोषणात सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊतांनी केलंय.

Cockroach Janata Party  NEET Protest
'दिल्ली विमानतळावर उतरताच, पोलीस तुरुंगात टाकतील'; कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेला अटकेची भीती?

येत्या 20 जुलैला निघणाऱ्य़ा संसदेवरील भव्य मोर्चापूर्वीच या आंदोलनाबाबत काय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या हातात या आंदोलनाचं आयतं कोलीत असल्यामुळे केंद्र सरकार प्रधान यांचा राजीनामा घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मुद्दा निकाली काढणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com