सर्वसामान्यांना झटका; सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, मध्यरात्रीपासून नवीन दर होणार लागू

CNG Price hike in pune : सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका बसला आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
CNG Price Hike
CNG Price HikeSaam Tv
Published On
Summary

सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा झटका

पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ

सीएनजी प्रति किलो दरात १ रुपयांनी वाढ

अक्षय बडवे, साम टीव्ही

अमेरिका-इराणने युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे. युद्ध थांबवण्यात आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचा दर स्वस्त होणार असल्याची चर्चा सुरू असताना पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री कायम असल्याचे दिसत आहे.

पुण्यात सीएनजीचे दर आज सोमवारी मध्यरात्रीपासून वाढणार आहे. सीएनजीचे दर प्रति किलो १ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सीएनजीचे दर प्रति किलो आता ९५.७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर यापूर्वी सीएनजीचे दर ९४.७५ रुपये होते.

CNG Price Hike
इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबलं, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थिती थांबल्यानंतरही भारताला महागाईचा फटका कायम बसत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका आणि इराण देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

CNG Price Hike
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट

काही दिवसांपूर्वी पुण्यात सीएनजीच्या दरात २.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज सोमवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना सीएनजीसाठी मध्यरात्रीपासून जादा पैसे मोजावे लागणार आहे.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं यु्द्धाला पूर्णविराम मिळालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये १४ अटींवर शांतता करार करण्यात आलाय. दोन्ही देशांत शांतता करार झाल्यानंतर होर्मुझीची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा दर स्वस्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com