मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं ही अफवा आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केलं आहे. ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेऊन यावर आपली भूमिका मांडणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
मात्र, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
या बैठकीत मंत्रिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. सरकारमधील मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्ये टाळा, दोन समाजांत तेढ निर्माण होणार नाही याचे भान ठेवा, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. पण, तो आता दूर करण्यात आला आहे. ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली आहे, त्यांच्याही मनातील संभ्रम मी दूर केला आहे, असंही शिंदे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. यावर मनोज जरांगे पाटील आज पत्रकारपरिषद घेणार असून ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.