Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! CM शिंदेंपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येला जाणार

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्येत जाणार आहे.
CM Eknath Shinde On Devendra Fadnavis  Ayodhya Tour
CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Ayodhya Tour Saam TV
Published On

CM Eknath Shinde Reaction On Ayodhya Tour : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्येत जाणार आहे. राज्यात आमचं शिवसेना-भाजप युतीचं सरकार आहे, त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते सुद्धा अयोध्येत दाखल होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde On Devendra Fadnavis  Ayodhya Tour
Ajit Pawar News : मला पुन्हा पुन्हा नॉट रिचेबल म्हणू नका; अजित पवार संतापले, नेमकं काय घडलं?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांसह आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले. मुंबई विमानतळावरून ते थेट लखनौच्या विमातळावर उतरले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. (Breaking Marathi News)

लखनौच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "लखनऊमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हा पाहायला मिळतोय हा उत्साह पाहून मी नतमस्तक होतो. अयोध्या हा आमच्यासाठी हा आस्थेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लखनौ विमानतळावरून काय म्हणाले CM शिंदे?

"जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभारी आहे. करोडो राम भक्त यांचा एक स्वप्न होतं की राम मंदिराच्या निर्माण व्हावं आणि ते होताना पाहायला मिळत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात राम मंदिर उभारत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील मी आभारी आहोत", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. (Maharashtra Political News)

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार'

दरम्यान, यावेळी माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली. राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात आमचं शिवसेना-भाजपचं सरकार आहे. कितीही टीका केली तरी अयोध्या दौरा आणि रामलल्लाचं दर्शन आमच्यासाठी राजनैतिक मुद्दा नाही, ही केवळ आमच्या भावनेचा विषय आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्यासोबत भाजप नेते हे देखील उद्या अयोध्येत येणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com