Cidco Lottery: घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोच्या किंमती १२ डिसेंबरला होणार जाहीर

Cidco House Price Announcement: सिडको सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सिडकोमधील घरांच्या किंमती १२ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.
Cidco Lottery
Cidco LotterySaam Tv
Published On

नवी मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु घराच्या किंमती दिवसेंदिवस महाग होत आहेत. त्यामुळेच मग सिडकोअंतर्गत तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध होतात. सिडकोअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे आहेत. सिडको सोडतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. (Cidco News)

Cidco Lottery
EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगचा दावा भोवला, हॅकरविरोधात गुन्हा दाखल

सिडकोच्या घरांच्या नोंदणी सुरु होऊन दीड महिना झाला आहे तरीही सिडकोने अद्याप घरांच्या किंमती जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे अनेक अर्जदारांच्या मनात नाराजी निर्माण झाल्याचे दिसत आहे. परंतु आता तुम्हाला जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. ११ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुदतीनंतर लगेचच १२ डिसेंबरला सिडको घराच्या किंमती जाहीर करणार आहे.

सिडकोकडून नवी मुंबईत ६७ हजार घरे बांधणार आहेत. त्यातील ४३ हजार घरांना महारेराची परवानगीदेखील मिळाली आहे. त्यांचे बांधकामदेखील सुरु आहे. यापैकी २६ हजार घरांसाठी सोडत योजना जाहीर केली होती. (Cidco House Price Announcement on 12th december)

Cidco Lottery
Gold Price Today : सोनं घ्या सोनं! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला; आजचा भाव किती पाहा

या घरांच्या किंमती येत्या १२ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. या घराची नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबरलाच संपणार होती. मात्र, अर्जदारांसाठी ही मुदत वाढवून ११ डिसेंबर करण्यात आली होती. आतापर्यंत ९५ इच्छुक लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे. १२ डिसेंबरला सिडकोच्या घराच्या किंमती जाहीर करण्यात येतील, असं सिडकोने सांगितले आहे.(CIDCO House Prices)

Cidco Lottery
Mumbai Local : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल खोळंबा, वेग मंदावला, प्रवाशांना मनस्ताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com