EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगचा दावा भोवला, हॅकरविरोधात गुन्हा दाखल

FIR against US-based man over claims to hack EVMs : ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ईव्हीएम हॅक करु शकतो, असा दावा एका तरुणाकडून करण्यात आलाय. ६३ ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार करु शकतो, असेही त्यानं व्हिडीओत म्हटलेय. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Assembly Election
EVMSaam
Published On

EVM Hack News : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाला. महायुतीला एकहाती सत्ता मिळाली. विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले अन् ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला. अनेकांना ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा केला. एका तरुणाला ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणं भोलवलं आहे. त्याच्याविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद शुजा यानं ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (FIR against US-based man over claims to hack EVMs)

सय्यद शुजा याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली. आयोगानं तातडीने कारवाई सुरु केली. आयोगाच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी सय्यद शुजा याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून याप्रकरणी आता अधिक तपास करण्यात येत आहे. सय्यद शुजा याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Assembly Election
EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा | Marathi News

निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सय्यद यानं ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत होते. व्हायरल व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाची मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी सय्यद शुजा याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Assembly Election
EVM वरील संशयाचं धुकं गावागावात, सोलापूर जिल्ह्यातील गावात 3 डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय काय ? EVM Hack Video

सय्यद शूजा याचा व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली. महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरले जाणारे ईव्हीएम हॅक करु शकतो, असा दावा व्हिडीओत शेजा याने केलेला. त्यासाठी त्याने आपला रेटही सांगितलेला. ५३ कोटी रुपये मिळाले तर ६३ जागांवरील ईव्हीएम हाक करु शकतो, अशी ऑफर दिल्याचे व्हिडीओत दिसतेय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम तयार करणाऱ्या पथकाचा भाग होतो. एका विशिष्ट प्रणालीचा वापर करून ईव्हीएममध्ये फेरफार केली जाऊ शकते, असा दावा शूजा यानं केल्याचं व्हिडीओत दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com