EVM वरील संशयाचं धुकं गावागावात, सोलापूर जिल्ह्यातील गावात 3 डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान

Ballot Paper Voting : राज्यात महायुतीला अभूतपुर्व यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर संशय व्यक्त करायला सुरुवात केलीय. त्याचं लोण आता गावखेड्यापर्यंत पोहचलंय. तर सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय काय आहे? आणि ग्रामस्थांचा ईव्हीएमबाबत काय आक्षेप आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Ballot Paper Voting
Ballot Paper Voting
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

राज्यात ईव्हीएमवर संशय उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले असतानाच याचं लोण आता गावा-गावापर्यंत पोहचलंय.. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये झालेल्या मतदानावर संशय व्यक्त करत स्वखर्चाने बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. या मतदारसंघातील निकाल कसा आहे? पाहूयात.

माळशिरसचा कौल कुणाला?

उत्तम जानकर, राष्ट्रवादी (SP) - 1 लाख 21 हजार 713

राम सातपुते, भाजप- 1 लाख 8 हजार 566 मतदान

13 हजार 147 मतांनी उत्तम जानकर विजयी

माळशिरसमधुन उत्तम जानकर विजयी झाले असले तरी मारकडवाडीतून राम सातपुतेंना लीड मिळालाय...त्यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. नेमकं मारकडवाडीतून कुणाला किती मतदान झालं? पाहूयात.

मारकडवाडीचा कौल कुणाला?

उत्तम जानकर, राष्ट्रवादी (SP)- 843 मतं

राम सातपुते, भाजप, 1003 मतं

मारकडवाडीतून सातपुतेंना 160 मतांचं लीड

Ballot Paper Voting
EVM मुळे पराभव झाला, मग सिद्ध करा; अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

मारकडवाडी हे उत्तम जानकर यांच्या विचाराचं गाव असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय... त्यासाठी 2014 आणि 2019 मधील विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचा संदर्भ देत ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर स्वखर्चानं फेर मतदानाचा निर्णय घेतलाय. त्यासंदर्भात तहसिलदारांना पत्र दिलं असून प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी केलीय.

Ballot Paper Voting
Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे

माळशिरसमधील मारकडवाडीतील ग्रामस्थांनी 3 डिसेंबरला सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर लगेचच मतमोजणीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रशासन आणि भाजपचा गट गावकऱ्यांची मागणी मान्य करून बॅलेट पेपरवर मतदान घेणार का? याची उत्सुकता आहे. मात्र बॅलेट पेपरवर करण्यात येणा-या मतदानात तफावत आढळून आल्यास फेरमतदानाची मागणी गावा-गावातून पुढे येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com