Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे

Sharad Pawar On EVM Scam: महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि नाना पटोले या यांनी देखील ईव्हीएम हॅकचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे
Sharad PawarSaam tv
Published On

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून महाविकास आघाडीचा पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत महायुतीवर अनेक आरोप केले आहेत. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ईव्हीएमवर पहिल्यांदाच शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

'ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. आम्हाला काही लोकांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं होतं. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवाला होता. मात्र सत्ता, पैशांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली गेली.', असा आरोप शरद पवार यांनी केला. आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे लक्षात आलं आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासांमध्ये जे मतदान झालं त्याची आकडेवारी धक्कादायक असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे
Maharashtra Politics : पराभूत उमेदवाराला जास्त मतदान कसं? गावकऱ्यांना ईव्हीएमवर शंका, फेरमतदान घेणार

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ईव्हीएम घोटाळ्यावर वक्तव्य करत महायुतीवर टीका केली आहे. नाना पटोले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये पारदर्शकता नसल्याचे समोर येत आहेत. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी आमची भूमिका आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशभरातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात असतील तर त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची आहे.'

तसंच, 'ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे याच कारणास्तव आत्मक्लेष उपोषणाला बसले आहेत. डॉ. बाबा आढाव यांना फोन करून आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली आणि लोकशाही वाचविण्यासाठी त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.', असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?

महाविकास आघाडीकडून होत असलेल्या आरोपांनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. ३ डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सर्व गोष्टी पारदर्शक झाल्याचा निवडणूक आयोगाचा दावा आहे. आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचे निरसन केलं जाईल असं आश्वासन देण्यात आले आहे.

Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे
Maharashtra Politics : गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला? महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट

रावसाहेब दानवे यांनी तर ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांना सुनावले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही हिमाचल हारलो, लोकसभेत आम्हाला यश मिळाले नाही. कर्नाटकामध्ये देखील यश मिळाले नाही. त्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. आम्ही हारलो तरी आक्षेप घेतला नाही. पण भाजप ज्या राज्यात जिंकले त्या ठिकाणी महाविकास आघाडीने सतत आपले अपयश झाकण्यासाठी कोणाच्या तरी माथ्यावर खापर फोडले. त्यासाठी त्यांनी चालवलेला हा प्रयोग आहे. ईव्हीएमसंदर्भात सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यांना कोर्टाने सांगितले होते की हॅक करून दाखवा. पण ते हॅक करून दाखवायला तयार नाहीत. ईव्हीएम हॅक होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे', असे आव्हान दानवेंनी केले.

Maharashtra Politics: ईव्हीएम हॅक होऊ शकतं, शरद पवारांना शंका; महायुती-मविआमध्ये दावे- प्रतिदावे
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंडांतर? कोणकोणते नेते अडचणीत? वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com