Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील २ विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. तर राम शिंदे यांनीही फेरमोजणीसाठी तयारी केल्याचं बोललं जात आहे.
 महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?
Maharashtra Politics :Saam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जोरदार बाजी मारली. या निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडी ढेर झाली. महायुतीने निवडणुकीत २३० जागा काबीज केल्या. महायुतीच्या यशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोपच उडाली आहे. तर या निवडणुकीत काही उमेदवार हजार-पाचशे मतांनी पराभूत झाले आहे. त्यापैकी २ विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देखमुख, यशोमती ठाकूर यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. यामध्ये कर्जत जामखेडचे भाजप नेते राम शिंदे, चांदिवलीचे नसीम खान, कर्जतचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं. या तिन्ही मतदारसंघातील नेत्यांना अवघ्या काही मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर या दोन मतदारसंघातील नेत्यांनी फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे.

 महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?
Maharashtra politics : मविआ प्रयोगाचा सर्वाधिक फटका कुणाला? ठाकरे मविआतून बाहेर पडणार?

रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. यानंतर कर्जत खोपोली मतदारसंघातील १८ बुथवरील मतदानयंत्रांची फेरमोजणी होणार आहे. फेरमोजणीसाठी सुधाकार घारे यांनी निवडणूक आयोगाच्या खात्यात ८ लाख ४९ हजार ६०० रुपये जमा केले आहेत. पुढील २५ दिवसांत फेर मतमोजणी होणार आहे. शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात सुधाकर घारे यांचा ५ हजार ६९४ मतांनी पराभव झाला आहे.

 महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?
Maharashtra Politics : 'ते' पुन्हा येणार! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? नवी तारीख आली समोर

मुंबईतील चांदिवली मतदारसंघात नसीम खान यांनी देखील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीची मागणी केली आहे. फेरमतमोजणीसाठी नसीम खान यांनी साडे नऊ लाख रुपये मोजले आहेत. नसीम खान हे चांदिवली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

 महाराष्ट्रातील ३ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट? उलटफेर होणार का?
Nanded Bypoll Election Result 2024: पहिल्या फेरीपासून मागे, शेवटी विजयाची माळ, नांदेडमध्ये रविंद्र चव्हाण यांनी गड राखला

दरम्यान, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारला नाही. यामुळे शिंदे हे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर राम शिंदे भूमिका घेणार आहेत. निवडणुकीदरम्यान, रिटर्निंग ऑफिसरने मोठी चूक केल्याचं शिंदे यांचं म्हणणं आहे. तसेच न्यायालयात याचिका देखील दाखल करणार असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com