Nana Patole : नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य; दिल्लीत हायकमांडसोबत काय चर्चा झाली? वाचा

Nana Patole on Maharashtra Politics : नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा केली. या चर्चेनंतर नाना पटोले यांनी राजीनाम्याबाबतही भाष्य केलं.
Nana Patole
Nana PatoleSaam tv
Published On

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास विकास आघाडीला मोठा फटका बसला. महायुतीच्या त्सुनामीमुळे महाविकास आघाडीची धूळधाण झाली आहे. राज्यातील पराभव महाविकास आघाडीतील काँग्रेसला जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निकाल आणि राजीनामाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली .

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळले. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी आज दिल्ली गाठली. दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, 'रमेश चेन्नीथला आणि मी राज्याच्या विधानसभेबाबत चर्चा केली. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला अनपेक्षित आहे. यामध्ये शुक्राचार्य कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने निवडणूक लढलो. खरगे यांच्यासोबत पाऊण तास चर्चा झाली. लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करू'.

Nana Patole
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

राजीनाम्याबाबत नाना पटोले काय म्हणाले?

'मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी देखील निकाल अनपेक्षित होता. मतदानाची आकडेवारी मोठी असली तरी ईव्हीएमबाबत निर्णय घेतला नाही. काँग्रेस पक्ष जनतेची भूमिका घेऊन लढणार आहे. माझ्या राजीनाम्याबाबत अजून कुठलाही चर्चा झाली नाही. या सर्व माध्यमातून आलेल्या बातमम्या आहेत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Nana Patole
Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

आमदार फोडाफोडीवर नाना पटोले म्हणाले, 'डाकूगिरी करणाऱ्या लोकांसाठी हे काही नवीन नाही. दारू, जिहाद करणाऱ्यांनी अडीच वर्षांपूर्वी हा प्रयत्न करून महाविकास आघाडीचे सरकार पडले होते, अशी टीका पटोलेंनी केली.

मुख्यमंत्रिपदाबाबत पटोले म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. आता एकनाथ शिंदे यांना भाजप काय आहे ते कळेल'.

Nana Patole
Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com