Maharashtra Politics: भाजपा विषारी सापासारखा, त्याला मारून टाका; मल्लिकार्जुन खरगे यांची जहरी टीका

Mallikarjun Kharge On Modi Government: सांगलीमध्ये काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Maharashtra Politics
Mallikarjun KhargeSaam Tv
Published On

विजय पाटील, सांगली

'भाजपा हा विषारी सापासारखा आहे.', अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. तसेच, 'राजकारणात सगळ्यात खतरनाक भाजप आणि आरएसएस आहे. एखाद्या विषारी सापाप्रमाणे भाजप आहे. त्यामुळे त्याला मारून टाका', असे आवाहन देखील मल्लिकार्जुन खरगेयांनी केलs आहे. सांगलीमध्ये ते काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेनिमित्ताने बोलत होते.

सांगलीत प्रचार सभेत भाषण करताना मलिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रात चोराचे सरकार आहे. चोरांनी मिळून बनवलेले हे सरकार आहे.', अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महायुती सरकारवर केली आहे. तसेच, 'भाजपाचे लोक खतरनाक असून आता रात्र खतरनाक आहे. त्यामुळे भाजपवाले कसे आणि कोणत्या वेशात येतील, हे तुम्हाला कळणार नाही कारण त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे.',असं मत देखील त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Politics
Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

'नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत आणि त्याहीपेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये आहे.',असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर केला आहे. 'घोटाळे झालेत कारण 50 खोके दिलेत, त्यामुळे पैसे कोठून आणणार? आणि पैसे देऊन हे सरकार चालवत आहेत, याचा अर्थ हे पैसे कुठून तरी चोरून आणून दिले असतील, नाही तर तुमच्या घरचे पैसे आणून दिले आहेत का?' असा सवाल देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com