धक्कादायक! मुंबईत ‘केमिकल आंबा’ घोटाळा उघड; खरेदीआधी ही बातमी वाचाच, अन्यथा...

Chemical Mango : नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात केमिकलने आंबे पिकवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एफडीएने छापा टाकून नमुने जप्त केले असून तपास सुरू आहे.
Mango
Mangoes
Published On

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकारानंतर आता काय कारवाई केली जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

बाजारात काही व्यापारी उघडपणे आंब्यांवर रसायनांची फवारणी करत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच एपीएमसी प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) तात्काळ 'ॲक्शन मोड'मध्ये आले. संयुक्त पथकाने बाजारात धडक छापा टाकत संशयित व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त केले आहेत. सध्या या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mango
Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

वाशीमधील एपीएमसी बाजारात रसायनांच्या साहाय्याने आंबे पिकवले जातात. या घटनेमुळे बाजारातील फळांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आपण जे खातो, ते सुरक्षित आहे का?” असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आंबे येतात, लोक आवडीने ते खरेदी करतात. पण केमिकल आंब्यामुळे लोकांच्या जिव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करण्याआधी तो केमिकल युक्त आहे का? हे तपासून पाहावे.

Mango
पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना दिलासा! सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्णपणे खुला होणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार!

केमिकलमुक्त आंबा कसा ओळखावा?

नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडे एकसारखा नसतो, त्यात थोडे हिरवे-पिवळे छटा दिसतात. मात्र, रसायनाने पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा किंवा लिंबासारखा पिवळा दिसतो. नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट गोड सुगंध येतो. जर आंब्याला अजिबात वास येत नसेल किंवा औषधांसारखा वास येत असेल, तर तो केमिकलचा असू शकतो. नैसर्गिक आंबा हातात घेतल्यावर सर्व बाजूंनी सारखा मऊ लागतो. केमिकलने पिकवलेला आंबा बाहेरून दिसायला मऊ वाटतो, पण दाबल्यावर आतून कडक असू शकतो.

Mango
HSC Result : १२ वीत नापास झालेल्या १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला जबर धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com