Mumbai Local Train Update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर स्पेशल पॉवर ब्लॉक, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि वांगणी या स्थानकांच्या दरम्यान पादचारी पुलाच्या कामासाठी स्पेशल पॉवर ब्लॉक असणार आहे. हा पॉवर ब्लॉक कधी असणार आहे आणि तेव्हा रेल्वेत काय बदल होणार आहेत हे जाणून घ्या..
Mumbai Local Train Update
Mumbai Local Train UpdateSaam Tv
Published On

Mumbai Local Power Block : मध्य रेल्वे, मुंबई विभाग दिनांक २२/२३.०२.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉंचींगसाठी अंबरनाथ (सर्व क्रॉसओवर आणि साइडिंग वगळून) आणि वांगणी (सर्व क्रॉसओवर वगळून) दरम्यान ०१:३० ते ०३:०० (मध्यरात्री) वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

बदलापूर (कल्याण एंड एफओबी) येथे १२ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (७ नंबर) आणि बदलापूर -वांगणी एफओबी (मीड- सेक्शन) येथे ४ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (४ नंबर) लाँच करण्यासाठी ब्लॉक परिचालीत केला जाईल. ब्लॉकमुळे, गाडी क्रमांक 11020 (भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोणार्क एक्सप्रेस) कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबेल.

खालील उपनगरीय गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३:५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बदलापूर लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल.

- परळ येथून रात्री २३:१३ वाजता सुटणारी परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत जाईल.

Mumbai Local Train Update
Maharashtra Politics : 'कोल्डवॉर'वर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांसोबत...

कर्जत येथून ०२:३० (मध्यरात्री) वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जतऐवजी अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.

ब्लॉकपूर्वी कर्जतला जाणारी शेवटची लोकल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३:३० वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०१:४९ वाजता पोहोचेल.

ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल - कर्जत येथून ०३:३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५:५६ वाजता पोहचेल.

Mumbai Local Train Update
ST Bus : महिलांना सवलत दिली, एसटी तोट्यात गेली; रोज ३ कोटींचं नुकसान; परिवहन मंत्री बरंच काही बोलले!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com