
Pratap Sarnaik ST Bus : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. दरम्यान महिलांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात आल्याचे विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. धाराशिवमधील एका पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमाला सरनाईक यांनी भेट दिली होती. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.
पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमामध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडे 'पत्रकरांना एसटीमध्ये सवलत द्यावी' अशी मागणी करण्यात आली. तेव्हा त्यांनी सवलतींमुळे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कबूल केले. एसटीला दररोज ३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे, तेव्हा कोणतीही नवी सवलत दिली जाणार नसल्याचे सरनाईक म्हणाले.
महिलांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली. आमच्या बहिणींना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. याशिवाय जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये वर्षाला सवलत आहे. या सवलतींमुळे एसटीला दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. सर्वांना सवलत देत बसलो तर मग एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल असे परिवहन मंत्री म्हणाले.
प्रताप सरनाईक यांनी महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना सवलती देत असल्याने एसटी महामंडळाला तोटा होत आहे. तेव्हा यापुढे एसटीमध्ये कोणत्याही प्रकारची नवीन सवलत मिळणार नाही असे स्पष्ट केले. परिवहन मंत्री यांच्या वक्तव्यामुळे एसटी प्रवासात पुढे महिलांना दिली जाणाऱ्या सवलतीवर परिणाम होईल अशी चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.