

मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभरातून दुसऱ्यांदा विस्कळीत
मस्जीद बंदर रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड
वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
मध्य रेल्वेची वाहतूक आज मंगळवारी दुसऱ्यांदा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर गाड्या आज सकाळपासून उशिराने धावत आहेत. दिवा, ठाणे स्टेशनवर सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर आता संध्याकाळी देखील मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. मशीद बंदर स्टेशन जवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गाड्या स्टेशनवर थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मध्य रेल्वेवरील गाड्या सकाळपासून उशिराने धावत असताना आता तांत्रिक बिघाडाची भर पडली आहे. कल्याण-सीएसएमटीदरम्यान धावणारी जलद लोकल मशीद बंदर स्टेशनच्या अलीकडे तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे लोकल गाड्या स्टेशनच्या अलीकडे थांबवण्यात आल्या. गाड्या थांबवण्यात आल्याने प्रवासी ट्रॅकवरून चालत स्टेशनला जात आहेत.
सध्या काय परिस्थिती काय?
सीएसएमटी स्टेशनवर बदलापूरहून येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर घेण्यात आली. कारण प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आधीच दुसरी लोकल उभी होती. सध्या लोकल गाड्या मागे घेण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 बंद ठेवण्यात आले होते. स्टेशनवर दुपारी 3.18 पासून हालचाल थांबवण्यात आली होती. आता गाड्या मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून वाहतूक सुरू होत आहे.
मध्य रेल्वेवर रात्री खर्डी स्टेशनजवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने घेतलेला ब्लॉक ३ वाजता संपून रेल्वे सुरू होणार होत्या. मात्र त्यांनी ब्लॉक ६ वाजेपर्यंत सुरू ठेवला. रेल्वेचा ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेस बंद राहिल्याने परिणामी आज देखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांना आज देखील लेटमार्क लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.