Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर

Mumbai Railway Train Local News : मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा बदल होणार असून नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या निर्णयामुळे अपघातांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर
Mumbai Railway Train Local News Saam tv
Published On
Summary
  • मुंबई लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजांची एंट्री

  • नॉन-एसी लोकलमध्ये नवीन सुरक्षा सुविधा

  • लटकून प्रवासावर बसणार आळा

  • चाचणीनंतर लवकरच सेवेत दाखल होणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईकरांचा श्वास असलेल्या लोकल सेवेत आमूलाग्र बदल होणार आहेत. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. लोकलच्या ताफ्यात लवकरच देशतील पहिली नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवांची लोकल ट्रेन येणार आहे. येत्या २ दिवसांत ही लोकल ताफ्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात मुंबई लोकलमधून पडून अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना कानावर आल्या. या घटना दुर्दैवी असून प्रवाशांचा निष्काळजीपणा दर्शवते. मात्र आता या घटना रोखण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवाशांचा लटकून प्रवास करणं यामुळे कायमच बंद होणार आहे.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर
Pune : ट्रायल रुममध्ये कॅमेरा लावला, कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ बनवला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ही लोकल ट्रेन आज किंवा उद्या सोलापूर मार्गे मुंबईत आणण्यात येणार असून तिला थेट मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात येईल. त्यानंतर तिथे या लोकलची चाचणी होईल. सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर
Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?

१२ डब्यांच्या साध्या लोकलला एसी लोकलप्रमाणे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. यातील रेल्वे गाड्या आज किंवा उद्या लोकलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ही लोकल गाडी चैन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेली आहे. त्याचे दरवाजे आपोआप चालू बंद होतात.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर
Kalyan : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे संपातजनक कृत्य, महिलेचा विनयभंग अन् नागरिकांना मारहाण; VIDEO समोर

त्यामुळे प्रवाशांना बाहेर लटकता येणार नाही. शिवाय रेल्वेत चढता उतरताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. एकदा दरवाजा बंद झाला तर बाहेरील प्रवाशाला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही. गाडी थेट दुसऱ्या स्थानकावर गेल्यानंतरच त्याचे दरवाजे खुले होतील. तसेच या लोकलचे दरवाजे बंद असले तरी या लोकलमध्ये कोणतीही एसीची सुविधा नसणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com