Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, बदलापूरमधून धीम्या गतीने लोकल सुरु

Badlapur - Ambernath Local Train : अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
Badlapur - Ambernath Local Train Update
Badlapur - Ambernath Local Train UpdateSAAM TV
Published On

Mumbai Local Update: मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. अशात या पावसाचा फटका आता मध्य रेल्वेवर बसल्याचं दिसत आहे. मध्य रेल्वेत गेल्या ३ तासापासून वाहतूक विस्कळीत झाली होती. अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीत बिघाडल्याने वाहतूकीवर त्याचाी परिणाम झाला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ३ तासांपासून वाहतूक ठप्प होती. अंबरनाथ (Ambernath) बदलापूर दरम्यान अप मार्गावर मालगाडी बंद पडली होती. आता काम पूर्ण झाले असून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Badlapur - Ambernath Local Train Update
Bhandara Rain: दमदार पावसानंतर बी - बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

कल्याणवरुन दुसरे इंजिन मागवले असून मालगाडीला सायडिंग करण्यात यश आले. मात्र यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

अंबरनाथ ते सीएसएमटी सेवा सुरू

बदलापूर आणि अंबरनाथच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे बदलापूर (Badlapur) मुंबई रेल्वेसेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. बदलापूरला जाणाऱ्या लोकल अंबरनाथ स्थानकात थांबवून तिथूनच पुन्हा सीएसएमटीसाठी रवाना करण्यात आल्या.

Badlapur - Ambernath Local Train Update
Train Viral Video: ट्रेन येत असल्याचे पाहून तरुणानं केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य, व्हिडिओ व्हायरल

आता मालगाडी सायडिंगला घेतल्याने धिम्या गतीने रेल्वे (Train) सेवा सुरू झाली आहे. कर्जत - बदलापूर दरम्यान अडकलेल्या लोकल हळूहळू पुढे रवाना होऊ लागल्यात. सिंहगड एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com