Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर त्या रात्री काय घडलं? बस अपघाताच्या अनेक गोष्टी फॉरेन्सिक अहवालातून उघड

Samruddhi Mahamarg Accident : फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
Buldhana Bus Accident
Buldhana Bus AccidentSaam tv
Published On: 

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गाव बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला झालेल्या  भीषण बस अपघातात  26 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आला आहे.

फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यामध्ये बसमध्ये किती डिझेल होतं? अपघात कसा झाला असावा? बसने अचानक एवढा पेट कसा घेतला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमधून समोर आली आहे.

रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

अपघात झाला तेव्हा बसमध्ये 350 लिटर डिझेल होते. अपघात रात्री 1 वाजून 32 मिनिटांच्या जवळपास झाला. अपघातग्रस्त बस साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर आली होती. अपघाताच्या वेळेला बसचा स्पीड 70 ते 80 किलोमीटर प्रति तास होता. (Latest Marathi News)

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident: मोठी बातमी! समृद्धी अपघातप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये चालत होती जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे. अपघातग्रस्त बसचं समोरचं चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डला धडकलं. त्यानंतर समोरचं चाक दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी काँक्रीटच्या दुभाजकाला धडकलं. याच दुभाजकाला बसचं पाठीमागचं चाकही त्याच पद्धतीने धडकलं आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली.

जेव्हा बसचे मागील चाक आरसीसी काँक्रीट दुभाजकाला धडकले, तेव्हा ही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडली. त्यांतर बस काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य दरवाजा खालच्या बाजूला दबला गेला.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident: एकाच वेळी २४ चिता; अश्रुंचा पुर अन् काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! बस अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार

फॉरेन्सिक फायर अहवालानुसार, जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने रस्त्यावर पलटी झाली. त्याच वेळेस बसच्या समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन डिझेल टॅंकवर आढळला. यामुळे 350 लिटर डिझेल सर्वत्र उडाले. हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि त्यामुळे बसने पेट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.