Buldhana Bus Accident News: बुलढाण्यातील भयंकर अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस चालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक होता. तसेच 279, 304, 337 व 427 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाण्यात बसचा अपघात कसा झाला?
१ जुलैच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस बुलढाणा सिंदखेडराजा परिसरात आली. त्यावेळी बसचा वेग जास्त होता. ही भरधाव बस थेट दुभाजकाला धडकली. त्यानंतर डिझेल टाकी फुटून बसने पेट घेतला. बस दरवाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवशांना बाहेर पडता आले नाही. या दुर्घनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह काही जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.