Sharad Pawar on Devendra Fadnavis: माझी गुगली कळलीच नाही, ती गोलंदाजालाच माहिती असते; फडणवीसांना उद्देशून शरद पवारांचं वक्तव्य

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
Sharad Pawar/Devendra Fadanvis
Sharad Pawar/Devendra FadanvisSaam TV
Published On

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यामध्ये पहाटेच्या शपथविधीवरून शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनी डबलगेम केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. (Latest Marathi News)

...तर दोन दिवसांनी शपथविधी का केला? पवारांचा सवाल

शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी फडणवीसांना उद्देशून वक्तव्य केलं. 'माझी गुगली त्यांना कळलीच नाही. माझ्या गुगलीवर ते आऊट झाले. त्यांना कसे कळणार. ती गोलंदाजालाच माहिती असते. त्यांना जर हे माहिती होते, तर त्यांनी दोन दिवसांनी शपथविधी का केला? असा सवाल शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar/Devendra Fadanvis
Devendra Fadnavis News : 'शरद पवारांनी डबल गेम केला', पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

कोयता गँग राज्य सरकारची देणगी - पवार

पुण्यातील कोयता गँगवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ' कोयता गँग हे मी इतक्या वर्षात ऐकलेलं नव्हतं. ज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महिलांवरील हल्ले, कोयता गँग राज्य सरकारची देणगी आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची क्षमता सरकारमध्ये नाही'.

बुलढाण्यातील भीषण अपघातावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने अपघात होताहेत, हे गेले काही महिने बघायला मिळत आहे. मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात'.

Sharad Pawar/Devendra Fadanvis
Sharad Pawar News | भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याची आमची तयारी होती! ,शरद पवार यांची माहीती..

अपघाता मृत्यू पावल्यानंतर देवेंद्रवासी होता - शरद पवार

'जो अपघातात मृत्यू पावतो, तो देवेंद्रवासी होतो असे लोक सांगतात. त्याचे कारण रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने झालेले नसावे. ज्यांनी रस्त्याचे नियोजन केलं, तो तयार केला, त्यांना ते लोक दोषी ठरवतात. जे झाले ते वाईट झाले, असे शरद पवार म्हणाले.

'५ लाख मदत देऊन प्रश्न सुटत नाहीत. असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करावी. त्यांनी रस्त्याची कमतरता शोधून काढावी.रस्त्यावर खुणा बघायला मिळत नाहीत. सलग रस्ता आहे. त्यामुळे वाहन चालवताना काही गोष्टी लक्षात येत नाही असे काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com