Gangster Sharad Mohol Case Updates
Gangster Sharad Mohol Case UpdatesSaam TV

Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील बडा मासा पोलिसांच्या जाळ्यात; आरोपींची संख्या वाढली

Sharad Mohol Case: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या बडा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे
Published on

Sharad Mohol Murder Case

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या बडा मासा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शुक्रवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ वर पोहचली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gangster Sharad Mohol Case Updates
Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर दरोड्याचा प्रयत्न; पोलिसांकडून चौघांना अटक

आदित्य गोळे (वय २४), नितीन खैरे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून त्याचे नाव समोर आलेले नाही. शरद मोहोळ याची ५ जानेवारीला पुण्यात (Pune) दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

सुतरदारा येथील राहत्या घराजवळ त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, शरद मोहोळ याची ज्यावेळी हत्या झाली, तेव्हा आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर याच्यासोबत हजर होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता.

यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे याने केली होती. तर आदित्य गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. तर तिसरा आरोपी सुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. या संपूर्ण कटात तो सहभागी होता. सध्या तिन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

Gangster Sharad Mohol Case Updates
Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने जनहित याचिकाकर्त्याला फटकारलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com