Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर दरोड्याचा प्रयत्न; पोलिसांकडून चौघांना अटक

Mumbai Crime News: वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.
toll plaza on Bandra-Worli sea link
toll plaza on Bandra-Worli sea linkSaam TV
Published On

Mumbai Latest Crime News

वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी टोलनाक्याच्या कॅबिनमध्ये जमा होणाऱ्या रक्कमेवर डल्ला मारण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा डाव उधळून लावला आहे.

समीर अन्वर शेख उर्फ मेढा २३ (४ महिने हद्दपार), मोहम्मद अली हजी अली शेख २८ (६ महिने हद्दपार), मोहम्मद हबीब समीर कुरेशी २२ (६ महिने हद्दपार), राज भरत खरे ३३ (१ वर्ष हद्दपार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

toll plaza on Bandra-Worli sea link
Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने जनहित याचिकाकर्त्याला फटकारलं

वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींवर यापूर्वी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र, तरी देखील आरोपी हे चोरीच्या उद्देशनाने मुंबईत आले होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. (Latest Marathi News)

या चारही आरोपींवर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. वांद्रे पोलिसांच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

शिधापत्रिका बनवून देणाऱ्याला अटक

मुंबईच्या चारकोप परिसरात नागरिकांना बनावट शिधापत्रिका बनवून देणाऱ्या एका व्यक्तीला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. चेतन रामेश्वर प्रजापती (33 वर्ष) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार सुनिल गुप्ता हा फरार झाला आहे.

शिधावाटप अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलीस अधिक तपास करत आहे.

toll plaza on Bandra-Worli sea link
Mumbai News: स्वच्छतेत मुंबईची पुन्हा घसरगुंडी, राष्ट्रीय सर्वेक्षणात ३७व्या क्रमांकावर; नवी मुंबई कोणत्या स्थानी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com