Navi Mumbai: SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई, भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या, ५ BLO अधिकाऱ्यांचे निलंबन

Navi Mumbai Kharghar SIR Form News : नवी मुंबईतील खारघरमध्ये झेरॉक्स सेंटरमध्ये ३,४०० SIR फॉर्म आढळल्याने खळबळ. ११ मतदान केंद्रांशी संबंधित फॉर्म प्रकरणात ५ BLO अधिकाऱ्यांचे निलंबन आणि एका व्यक्तीविरोधात FIR दाखल.
NAVI MUMBAI SIR FORM CASE: 3,400 FORMS FOUND, 5 BLOs FACE SUSPENSION
NAVI MUMBAI SIR FORM CASE: 3,400 FORMS FOUND, 5 BLOs FACE SUSPENSIONSaam Tv News
Published On
Summary
  • खारघर सेक्टर १९ मधील झेरॉक्स सेंटरमध्ये ३,४०० SIR फॉर्म आढळल्याने खळबळ

  • आढळलेले SIR फॉर्म एकूण ११ मतदान केंद्रांशी संबंधित

  • सूरज पाटील विरोधात खारघर पोलीस ठाण्यात FIR दाखल

  • ५ BLO अधिकाऱ्यांचे निलंबन

नवी मुंबई विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. SIR सारख्या गोपनीय आणि महत्त्वाची माहिती देणाऱ्या फॉर्मचे झेरॉक्स हे एका झेरॉक्स सेंटरमध्ये आढळले. हा सगळा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला. याची पोलखोल झाल्यानंतर आता मात्र ५ BLO अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांचं निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये समोर आली. निवडणूक आयोगाचे अधिकृत SIR फॉर्म अनधिकृतपणे झेरॉक्स केली जात असल्याची तक्रार ठाकरे सेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली होती. तक्रारीची तातडीने दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित झेरॉक्स सेंटरवर धाव घेत प्राथमिक चौकशी केली. यावेळी मुर्बी गाव, खारघर येथील भाजपचे पदाधिकारी सूरज पाटील हे SIR फॉर्मची झेरॉक्स काढताना आढळून आले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यात तब्बल ३,४०० SIR फॉर्म आढळले. हे SIR फॉर्म एकूण ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले.

NAVI MUMBAI SIR FORM CASE: 3,400 FORMS FOUND, 5 BLOs FACE SUSPENSION
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

यापैकी पाच मतदान केंद्रांचे १०० पेक्षा अधिक SIR फॉर्म होते, तर उर्वरित सहा मतदान केंद्रांची प्रत्येकी एक फॉर्म आढळून आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणे अपेक्षित असलेली ही संवेदनशील कागदपत्रे बाहेरील व्यक्तीच्या ताब्यात कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सूरज पाटील विरोधात खारघर पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली आहे. भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

NAVI MUMBAI SIR FORM CASE: 3,400 FORMS FOUND, 5 BLOs FACE SUSPENSION
EPFO Rules Update : PF काढण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल! 'या' अटींना पात्र नसाल तर काढता येणार नाहीत पैसे, जाणून घ्या नवे नियम

दरम्यान, ज्या पाच BLO यांच्याकडून SIR चे फॉर्म बाहेर गेल्याचे आढळले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्तांना या पाचही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी क्रमांक ३ नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com