Pune : पुण्यात खळबळ! भाजप आमदाराच्याच घरात चोरी; पॉश सोसायटीत घडला धक्कादायक प्रकार; नेमकं काय चोरीला गेलं?

Pune BJP MLA Prajakt Tanpure News : पुण्यातील विमाननगर परिसरात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली. लुई व्हिटॉन बॅग, ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिलसह ९० हजार ९१६ रुपयांचा ऐवज चोरीला.
Maharashtra BJP MlA Prajakat Tanpure Home Theft
Maharashtra BJP MlA Prajakat Tanpure Home Theft AI Image
Published On: 

पुण्यातील विमाननगर परिसरातून चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी हात साफ केला आहे. त्यांच्या घरातून महागडी लुई व्हिटॉन कंपनीची चामड्याची बॅग, नामांकित कंपनीचे ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिल अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत ९० हजार ९१६ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचे विमाननगरमधील लुंकड स्काय व्हिला सोसायटीमध्ये घर आहे. या घरातील कपाटात ठेवलेली महागडी चामड्याची बॅग अचानक गायब झाल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत घरातील मोटारचालक संग्राम तमनेर यांच्याकडे विचारणा केली. बॅग नेमकी कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी घरात काम करणाऱ्या महिलांकडेही चौकशी करण्यात आली.

Maharashtra BJP MlA Prajakat Tanpure Home Theft
Saturday Horoscope : तुळशीमातेच्या कृपेने 'या' 6 राशींच्या आयुष्यात येणार आनंद; आर्थिक लाभासह व्यवसायात प्रगतीचे संकेत!

सर्वांनी मिळून घरात बॅग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग मिळाली नाही. त्यानंतर घरातील इतर वस्तूंची पाहणी केली असता ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिल यांसारख्या वस्तूही गायब असल्याचे समोर आले. यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय अधिक बळावला. ही घटना २२ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी आमदारांच्या मोटारीवरील चालक संग्राम चंद्रभान तमनेर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

Maharashtra BJP MlA Prajakat Tanpure Home Theft
Train Ticket : तुमच्या नावाच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती करू शकणार प्रवास, रेल्वे विभागाचा नवा नियम

आमदारांच्या निवासस्थानीच चोरी झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. घरातील मौल्यवान वस्तू नेमक्या कोणी चोरल्या आणि चोरी कशी झाली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चोरीच्या घटनेमागील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.