मेष : आजचा दिवस संयमाने काम करण्याचा आहे. इतरांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचार टाळा. आपले मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात उधारी टाळा.
वृषभ: कौटुंबिक समस्या सुटतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. सुखसोयींमध्ये वाढ होईल. व्यावसायिक जीवनाबाबत घाईचे निर्णय घेणे टाळा. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.
मिथुन: तुमचे धैर्य वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमची अनोळखी लोकांशी भेट होईल. मानसिक तणाव कमी होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायात अतिरिक्त गुंतवणूक करणे टाळा.
कर्क : शब्दांचा काळजीपूर्वक वापर करा. प्रवास फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका. मानसिक त्रास कमी होतील. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. तुळशी मातेच्या कृपेने घरात चांगली बातमी येईल.
सिंह: अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुम्हाला दूरवरून चांगली बातमी मिळेल. पैसे उधार घेणे टाळा. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
कन्या: तुळशीमातेच्या कृपेने पैशांची कमी भासणार नाही. कौटुंबिक समस्या सुटतील. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शिक्षणात यश मिळेल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल.
तूळ: तुमच्या नेतृत्व कौशल्यात वाढ होईल. दुसऱ्याच्या सल्ल्यामुळे तुमचा विचार बदलू नका. तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखाल. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील. तुमची व्यावसायिक स्थिती मजबूत होईल.
वृश्चिक : अचानक आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. आपल्या शब्दांचा सुज्ञपणे वापर करा. तुमचे मन उत्साही राहील, आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील.
धनु: कामात यश मिळेल. चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. करिअरचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
मकर : कामात अनुकूल परिणाम मिळतील. तुमची अनोळखी लोकांशी भेट होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा खर्चही अचानक वाढेल. प्रवास फायदेशीर ठरेल. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ: वादात पडणे टाळा. करिअरसंबंधित समस्या सुटतील. घाईचे निर्णय घेऊ नका. आज मोठी गुंतवणूक करणे टाळा. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन: लोकांशी संघर्ष टाळा. प्रत्येक काम सावधगिरीने करा. तुमची महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. तणाव वाढवणारे कोणतेही काम करू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.