तब्बल 44 वर्षांनी भाजपचा दुसरा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झालाय... मात्र महापालिकेच्या सभागृहात पहिल्याच दिवशी महापौर निवडीआधी झालेल्या या घोषणाबाजीनं महापालिकेचं सभागृह शक्तीप्रदर्शनाचा आखाडा बनल... एका बाजूला ठाकरेच्या तर दुसऱ्या बाजूला मोदी आणि देवाभाऊच्या घोषणांनी महापालिकेचं वातावरण चांगलचं तापलं....ते ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत...
विरोधकांनी उमेदवार न दिल्याने महापौरपदाची निवड बिनविरोध झाली असली तरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणायुद्धामुळे नव्या संघर्षांचा वाद पेटलाय... महापौर निवडीवेळी ठाकरेसेनेनं पिठासीन अधिकाऱ्यांवरून आक्षेप घेतल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला... इतकचं काय तर उपमहापौर संजय घाडींचं भाषण सुरु होताच ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत सभात्याग केला...एवढंच नाही तरमहापौर उपमहापौर यांच्या भाषणाची प्रतही फाडुन फेकली...त्यामुळे कधीकाळी सत्तेत एकत्र असणारे दोन मित्रपक्ष आमनेसामने उभे राहिल्यानं अस्तित्वाच्या लढाई पहिल्या दिवसापासूनच सुरू झालीय.. एकूणच भविष्यातील संघर्षांचीच ही नांदी म्हणावी लागेल..
आता मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर तर शिंदेसेनेचा उपमहापौर झालाय.. सुधार समिती अध्यक्ष पद मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक आपल्या बाजूनं खेचून घेण्यात शिंदेसेनेलाही यश आलयं... मात्र महापौर आणि उपमहापौरपदानंतर शिक्षण समिती, स्थायी समिती, सुधार समितीच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार? याची उत्सुकता मुंबईकरांना लागलीय...मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष थेट रस्त्यावरुन सभागृहापर्यंत पोहचल्यानं आगामी काळ मुंबईच्या राजकारणात वादळी ठरणार... हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.