अजितदादांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाला, पुरावा नष्ट? अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

Ajit pawar plane accident update : अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांच्या अपघाताविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ajit pawar plane accident update
Ajit pawar plane accident updateSaam tv
Published On

अजित पवारांच्या विमान अपघातावरून नवनवीन आरोप केले जात आहेत. रोहित पवारांनी अजितदादांचा घात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. रोहित पवारांच्या दाव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही दुजोरा दिला आहे. या आरोपादरम्यान विमान अपघाताची शॉकिंग अपडेट समोर आली आहे. बारामतीमधील विमान अपघातामधील ब्लॅकबॉक्स जळाला आहे. त्यामुळे डेटा रिकव्हर करायला अडचण येत आहे. त्यामुळे ब्लॅकबॉक्समधील पुरावा नष्ट झाला का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Ajit pawar plane accident update
Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

अजित पवार विमान अपघात प्रकरणातही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅकबॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण येत असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. अमोल मिटकरी म्हणाले, आता ब्लॅकबॉक्स परदेशात रिकव्हर होणार आहे. त्यामुळे लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो'.

Ajit pawar plane accident update
मुख्याध्यापकाने आयुष्य संपवलं; शैक्षणिक वर्तुळात खळबळ

'आम्ही तोवर वाट पाहू. पण त्याआधी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज,पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून किती वाजता आणि कुण्याच्या गाडीत निघाले. कोणत्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले. त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व या पायलटचा २८ जानेवारी २०२६ चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा, अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली.

Ajit pawar plane accident update
थरारक! तरुण रेल्वे ट्रॅकवर डोके ठेवून झोपला, तितक्यात ट्रेन आली अन्...; CSMT स्टेशनवरील धक्कादायक प्रकार, VIDEO

अजितदादांचं विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का?

अजित पवार विमान अपघात तपास प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आली आहे. विमानाच्या एअरवर्थिनेस म्हणजेच हवाई प्रवासक्षमता आणि विमानाची उड्डाण योग्यतेबाबत तपास होणार आहे. DGCA कडून विमानाच्या एअरवर्थिनेस आणि ऑपरेशनल कंडीशनबाबत समांतर चौकशी सुरू होणार आहे. तपासाअंती ते विमान उडण्यासाठी सुरक्षित होतं का, याबाबत स्पष्टता येणार आहे. या तपासणीला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून खासगी विमान कंपनीच्या विविध कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com