Pune : धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याकडून कोंढव्याचा 'कराची' उल्लेख; गुन्हा दाखल

pune Kondhwa : पुण्यातील कोंढवा भागाला ‘कराची’ म्हटल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Pune
Pune Pune
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने कोंढवा भागाला 'पाकिस्तानचे कराची' असे म्हटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकार थांबले नाहीत तर जनता अशा मानसिकतेच्या लोकांना योग्य उत्तर देईल, असा टोला प्रशांत जगताप यांना लगावला.

भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहंदळे यांनी एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा उल्लेख 'पाकिस्तानचे कराची' असा केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनबाहेर तीव्र निदर्शने केली आणि कडक कारवाईची मागणी केली. लोकांचा रोष पाहून पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मेहंदळे याच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला.

Pune
महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी एकत्र याच; 'मराठीच बोलू' चळवळीत व्हा सहभागी
पुण्यातील कोंढव्याला सातत्याने टार्गेट करून बदनाम केले जात आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. प्रशासनाने आणि सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा सामाजिक सलोखा बिघडण्यास हे लोक कारणीभूत ठरतील.
प्रशांत जगताप, काँग्रेस

पोलिसांनी सर्वेश मेहंदळे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पुण्यातील कोंढवा भागात घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. भाजपकडून सातत्याने या भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी अशा विकृत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pune
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ३८०० रूपयांनी झालं स्वस्त, वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, भाजप पदाधिकारी सातत्याने कोंढवा भागाची बदनामी करत आहेत. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. अशा विकृत मानसिकतेच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Pune
पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com