

महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपने महाराष्ट्रभर एमआयएमला पाठिंबा दिल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'भाजप कामाठीपुराबाहेर उभा आहे, त्यांना कुणीही चालते.', असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर खरपूस भाषेत टीका केली. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजपबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपने अनेक महानगर पालिकांनिवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी विचार असलेल्या पक्षांसोबत युती केली. मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसने एमआयएमला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली तर अकोल्यामध्ये एमआयएमसोबत युती केली. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, 'मीरा भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिला. महराष्ट्रभर भाजपची एमआयएमसोबत छुपी युती झाली आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे दुतोंडी गांडुळ आहे. भाजप कामाठीपुऱ्याबाहेर उभा असून त्यांना कुणीही चालते.'
भाजप ब्लॅकमेलिंगचा धंदा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केली आहे. 'भाजपकडून ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू आहे. फाईल ओपन आहे असे म्हणत भाजपकडून ब्लॅकमेलिंग सुरू आहे. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ब्लॅकमेलिंग करत आहे ना. अजित पवार भाजपला शिव्या घालतात तरी ते सत्तेत आहेत. सावरकरांचे विचार मानत नाहीत तर अजित पवर सत्तेत कसे बसतात?', असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.
अकोल्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली यावरून देखील संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा शाधला. 'राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भरदिवसा हत्या होतेय. फडणवीस राज्य वाऱ्यावर सोडून पळत आहेत.', असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'संयुक्त मुलाखतीत दोन धुरंदर एकत्र आलेत. ठाकरे बंधूंची मुलाखत ही महाराष्ट्राची मुलाखत आहे. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीत जनतेच्या मनातील प्रश्न आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.