भाजप-शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच पहिली ठिणगी, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Shinde Sena Alliance Latest Dispute In Kalyan Dombivli: केडीएमसीतील मनसेच्या सत्तेतील सहभागावरून भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष वाढला आहे. भाजपने दिलेल्या अल्टिमेटमला राजेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपला थेट इशारा दिला.
BJP Shinde Sena alliance latest dispute in Kalyan Dombivli
BJP Shinde Sena alliance latest dispute in Kalyan Dombivlisaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

केडीएमसीच्या सत्तेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बाहेर काढावे, असा अल्टिमेटम भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजपने आम्हाला अल्टिमेटम देऊ नये,’ असा थेट इशारा शिंदे गटाचे नेते राजेश कदम यांनी दिला आहे. मनसेसोबतच्या राजकीय समीकरणावरून सुरू झालेल्या या वादात राजेश कदम यांनी भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनसेबाबत आमचे वरिष्ठ नेते अमित ठाकरे यांनी जे काही केले, त्याला आम्ही समर्थन दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

BJP Shinde Sena alliance latest dispute in Kalyan Dombivli
शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन होणार? एकनाथ शिंदेंकडे काय आहे पर्याय? खासदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

तसेच, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूरमध्ये भाजपला युतीधर्म आठवला नाही का? असा सवाल करत अंबरनाथ आणि भिवंडीत काँग्रेससोबत युती केल्याचा दाखला कदम यांनी दिला. केडीएमसी निवडणुकीपूर्वी ‘महापौर बसणार, सत्ता येणार’ अशा वल्गना भाजपकडून केल्या जात होत्या. मात्र, सत्तेची ‘मलाई’ खाण्यासाठी भाजप आमच्यासोबत आल्याचा आरोपही राजेश कदम यांनी केला.

BJP Shinde Sena alliance latest dispute in Kalyan Dombivli
महायुतीत पुन्हा खदखद! शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा; काहीवेळातच हाती घेतलं कमळ

विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाने मनसेसोबत गट स्थापन केला, त्यावेळी भाजप गप्प का बसले? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे केडीएमसीतील सत्तासमीकरणावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या भाजपच्या मागणीला शिंदे गट काय भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com