शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन होणार? एकनाथ शिंदेंकडे काय आहे पर्याय? खासदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सुनावणी सुरू असतानाच, शिंदे गटाच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या एका अलीकडील दाव्यामुळे या प्रकरणाला एक नवीन राजकीय वळण मिळाले आहे.
Maharashtra Politics
Supreme Court hearing on Shiv Sena symbol dispute
Published On
Summary
  • शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

  • शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो

  • कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद केला

शिवसेना नेमकी कुणाची, याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय. पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी सुरू झालीय. शिंदे गटाचा पक्ष कसा अवैध आहे, हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी पटवून दिले. आता शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.

Maharashtra Politics
Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होण्याआधी आता अनेक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. . ठाकुर्ली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरूय. त्याचदरम्यान संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत मोठा दावा केलाय.

शिंदे गटात चलबिचल सुरू असून त्यांच्या समोर आता दुसऱ्या पक्षात विलीन होण्याच पर्याय उरलाय. भाजप आणि प्रहार पक्षात ते विलीन होऊ शकतात, असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. सुप्रीम कोर्टात पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. कपिल सिब्बल हे कादाचित आपला युक्तीवाद संपवतील. कोर्ट आज शिंदे गटाची बाजू ऐकून घेणार आहे.

Maharashtra Politics
राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; रायगडमध्ये मनसेला भगदाड,८ प्रमुख नेत्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

दरम्यान फक्त विधीमंडळातील काही आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ राजकीय पक्ष फुटला असं मानता येणार नाही. ही भूमिका सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर स्पष्टपणे मांडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या मनात काही प्रश्न आणि शंका होत्या. त्या सर्व मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलंय. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक कायदेशीर नियम न पाळता सत्तेत सहभागी होत असतील तर त्याचा लोकशाही आणि संविधानावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी न्यायालयाने बंधनं घातली पाहिजेत, असं संजय राऊत म्हणालेत.

शिंदे गटासमोर हे दोन पर्याय

पक्ष चिन्ह ठाकरे गटाला मिळालं किंवा गोठलं गेल तर शिंदे गटाकडे दोन पर्याय असणार आहेत. यातील एक पर्याय म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, शिंदे गटाला नवीन नाव आणि वेगळे निवडणूक चिन्ह निवडावे लागेल.'बाळासाहेबांच्या विचारांची चोरी' झाल्याचं म्हणत शिंदे गटाला आपल्या जनसंपर्क मोहिमेत अधिक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल.दुसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये किंवा भाजपसोबत असलेल्या एखाद्या पक्षात शिंदे गटाला विलीन व्हावे लागेल.

कोणत्या पक्षात विलीन होणार शिंदे गट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत बोलताना म्हणाले हा पक्ष अमित शाह यांचा आहे. शिंदे गट भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होती. काही दिवसापूर्वीच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिंदेंना आता त्यांच्या पक्षात जावे विलीन व्हावे लागेल. नाही भाजपमध्ये जावे लागेल. परंतु अमित शाह हे त्यांचे कर्ते आहेत, त्यामुळे अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर ते निर्णय घेतील, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com