BJP Mumbai Meeting: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची फिल्डिंग; मुंबईत विजयी 'षटकार' मारण्यासाठी ठरली रणनीती

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने ग्राउंड पातळीपासून काम करण्यास सुरुवात केलीय. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय नेतृत्त्वाच्या अमंलबजावणीसाठी आज मुंबईत बैठक घेण्यात आली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला.
Loksabha Election
Loksabha ElectionSaam Tv
Published On

BJP Review Meeting Mumbai 6 Loksabha Constituencies :

२०४७ चा विकसित भारत हा संकल्प हाती घेऊन भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलीय. तीन-चार दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची बैठक झाली होती. आज मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी वॉर्ड पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडली. (Latest News)

आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री Union (Home Minister) अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपने प्रत्येक मतदारसंघात ५० पेक्षा जास्त मते जिंकण्याचा निर्धार करण्यात आला होता. केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी मुंबई भाजपकडून (BJP) आज ही बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीत पक्ष म्हणून काय नवे प्रयोग करायचे आहेत. हे ठरवण्यासाठी वार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील सहाही जागा आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास आशिष शेलार यांनी बैंठकीनंतर व्यक्त केला. २०४७ चा विकसित भारत हा संकल्प घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत. २३ तारीख नंतरच्या केंद्राने दिलेला कार्यक्रम कसा इम्प्लिमेंट होईल, याबाबत बैठका होतील, पुढील रणनीती बाबत बोलताना शेलार म्हणाले. सगळ्या हिंदूंचे स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस २२ जानेवारी आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये मिलन कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. २२७ वॉर्डमध्ये संघ आणि भाजप जाऊन दाखवणार आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये १० हजार घरात दिवे लावण्याचा कार्यक्रम संघासोबत केला जाणार असल्याचं शेलार म्हणाले.

Loksabha Election
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत 'विधानसभा पॅटर्न'; भाजपनं आखली खास रणनीती

महाराष्ट्रात मोठा विजय मिळविण्याचा दावा

दिल्लीच्या बैठकीत राज्यनिहाय लोकसभा जागांची स्थिती आणि त्या जिंकण्याच्या शक्यता, यावर चर्चा झाली होती. सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील मतदारसंघांचा आढावा सादर केला. संभाव्य युती करण्यासाठी सहयोगी पक्षांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळण्याचा दावा करण्यात आला होता.

५० प्लस मते मिळवण्याचा निर्धार

दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना विजयाचा मंत्र दिला होता. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असेही त्यांनी म्हटले होते.

Loksabha Election
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा ग्राऊंड फ्लोअर तयार; अयोध्या परिसरात कुठे काय असणार? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com