अयोध्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्या परिसरात राम मंदिरासाठी बांधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या राम मंदिराचा ग्राऊंड प्लोअर पूर्णपणे तयार झाल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
चंपत राय यांनी म्हटलं की, '७० एकर जमिनीवर राम मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिर हे ७० एकर जमिनीत उभारण्यामागे मोठं कारण आहे. गेल्या ७० वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात आहे. या जमिनीवरूनच हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. या जमिनीवर तीन मजली मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराचा ग्राऊंड फ्लोअर बांधून तयार झाला आहे. सध्या पहिला मजला तयार करण्याचं काम सुरु आहे. मंदिराची महत्वाच्या सीमारेषेतील भागातही काम सुरु आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चंपत राय पुढे म्हणाले, '२०२२ साली मे महिन्यात मंदिर बांधण्याचं काम सुरु करण्यात आलं. मंदिर बांधण्यासाठी राजस्थानमधील बंसी पहाडपूरच्या गुलाबीच्या वाळूचा खडक वापर करण्यात येत आहे. या मंदिराचे मजले तयार करण्यासाठी मकराना संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. तर मंदिराचा गर्भगृह पांढरा रंगाच्या संगमवरी दगडापासून करण्यात आला आहे. मंदिराखालील भाग पोकळ नाही. दोन्ही मंदिर आणि परकोटा मंदिराचे वय हे हजार वर्ष आहे. मंदिर तयार करण्यासाठी २२ लाख क्यूबिक दगडाचा वापर करण्यात येत आहे'.
'आगामी ७ ते ८ महिन्यात सात मंदिर बांधण्यात येणार आहेत. यात महर्षि वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी आणि अहिल्या यांच्या मंदिराचा सामावेश आहे. तसेच आवारात जटायूची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, असे चंपत राय म्हणाले.
चंपत राय पुढे म्हणाले, 'मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी अनेक प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. २५ भाविकांसाठी वस्तू ठेवण्यासाठी लॉकर, पाणी, शौचालय, रुग्णालय या सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेवर दबाव वाढू नये, यासाठी दोन सीवर ट्रीटमेंट प्लांट आहेत. मंदिराच्या वापरासाठी स्वतंत्र्यपणे वीज निर्मिती करण्यात येत आहे'.
रामलल्लाच्या मूर्तीबाबत चंपत राय यांनी सांगितले की,'५ वर्षांच्या मुलाचं रेखाचित्र तयार करण्यात येणार आहे. कपाळापर्यंतची उंची ही ५१ इंच असणार आहे. मूर्तीमध्ये देवत्व आणि बालसुलभता असणार आहे. या मंदिराच्या दक्षिणेला हनुमानजी असणार आहे. तर पूर्वेच्या दिशेकडे प्रवेशद्वार असणार आहे. तसेच दिव्यांगासाठी देखील खास व्यवस्था असणार आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.