''सरकारला अनेकदा आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. मोर्चे काढले, आंदोलनं केली तरी सरकारला जाग येईना. कांदा निर्यात बाबतीत केंद्रानेच अडचण केलेली आहे. म्हणून कोल्हे रस्त्यावर उतरले'', असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. याचबद्दल बोलताना ते असं म्हणाले आहेत.
जयंत पाटील म्हणाले की, ''अजित पवार यांनी हा मोर्चा पर्सनली घेऊ नये. केवळ त्यांच्या मतदारसंघातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. खरं तर आघाडी सरकारच्या काळात असे मोर्चे निघाले तर त्या नेत्याला बोलवून घेतलं जायचं. पण आता मोर्चे काढणाऱ्यांना टार्गेट केलं जातं.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुण्यातील (Pune Latest News) शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना विकास निधी दिला जात नसल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना ते म्हणले, ''अजित पवार (Ajit Pawar Latest News) पालकमंत्री आहेत, त्यांनी उगाचच पालकमंत्री पद घेतलं नाही. ते त्यांच्या माणसांना निधी देणारचं. मविआ काळात ही असे आरोप झाले होते. त्यावेळी आरोप करणारे आणि आत्ता आरोप करणारे सगळे मांडीला मांडी लावून बसलेत.'' (Latest Marathi News)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ''चंद्रशेखर बावनकुळे यांना या मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या हे पटवून देण्याचा संधी होती. मात्र त्यांनी हा मोर्चा व्यवस्थित टॅकल करता आला नाही.''
ते म्हणाले, ''शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवशी बावनकुळे, नितेश राणे बोलू लागले. आणखी तीन दिवस मोर्चा सुरूच राहणार आहे. म्हणजे या मोर्चाचे परिणाम जाणवू लागले आहेत.''
पाटील पुढे म्हणाले, ''लोकसभा आणि विधानसभा संदर्भात आम्ही महा विकास आघाडीची लवकरच चर्चा होईल आणि जागा वाटपाचा निर्णय व्हायला आता वेळ लागणार नाही.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.