Dahi Handi 2023: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या वरळीत आशिष शेलार 'परिवर्तना'ची दहीहंडी उभारणार

Dahi Handi 2023: भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar ) यांना भाजपकडून मुंबईची जबाबदारी मिळाल्यापासून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
Dahi Handi 2023:
Dahi Handi 2023: Saam tv
Published On

सूरज मसुरकर

Dahi Handi 2023 Latest News:

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar ) यांना भाजपकडून मुंबईची जबाबदारी मिळाल्यापासून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. आशिष शेलार यांच्याकडून यावर्षी देखील आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात दहीहंडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आशिष शेलार यांनी वरळी मतदारसंघातील दहीहंडीला 'परिवर्तनाची हंडी' नाव दिलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील वरळीत (Worli) यंदा पुन्हा एकदा राजकीय दहीहंडी रंगणार आहे. भाजपने आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात 'परिवर्तना'ची हंडीची आयोजन करत थेट आव्हान दिलं आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या राजकीय हंडीबद्दल घोषणा केली आहे. मुंबईत आता मराठी दांडिया, मराठमोळी 'दिवाळी पहाट'नंतर आता भाजपची परिवर्तनाची दहीहंडी पाहायला मिळणार आहे .

Dahi Handi 2023:
Fodder Scam News: चारा घोटाळा प्रकरणात ३५ जणांची निर्दोष सुटका, इतर आरोपींना कोर्टाने काय दिली शिक्षा?

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी भाजपकडून वरळीत 'परिवर्तनाची दहीहंडी' उभारली जाणार आहे. भाजपने तशी तयारी केली आहे. तसेच आशिष शेलार लवकरच यासंदर्भातील सविस्तर माहितीसह घोषणा करतील.

गेल्यावर्षी देखील भाजपने जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित केली होती. यावर्षी याच मैदानात परिवर्तनाची दहीहंडी करत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. (Dahi Handi)

Dahi Handi 2023:
Cyber Fraud News: सायबर चोरट्यांचा प्रताप! देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; प्रकरण काय?

दरम्यान, वरळीतील जांभोरी मैदानात दरवर्षी ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जायचं. मात्र, गेल्या वर्षांपासून भाजपकडून जांभोरी मैदानावर भाजपने दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com